College News and Archive
आनंदवनाचा दीपस्तंभ: डॉ. विकास बाबा आमटे
दि. ०८ नोव्हेंबर २०२२ , आनंदवन.
डॉ. विकास बाबा आमटे यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्यानिमित्त साप्ताहिक सह्याद्रीचा राखणदार मध्ये प्रकाशित विशेषांक ‘आनंदवनातील विकासपर्व‘…
आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.
दि. २४ ऑगस्ट २०२२ , आनिकृम, आनंदवन.
आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे सुयश
दि. ०९ आणि १७ ऑगस्ट २०२२ , आनिकृम, आनंदवन.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे दि. ०५ ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट २०२२ दरम्यान संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विदर्भातील एकूण 37 संघांनी सहभाग घेतला होता त्यातून आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाची मुलींची चमू उपविजेती ठरली.
उपविजेता ठरलेल्या मुलींच्या चमूमध्ये द्वितीय सत्रातील कु.होमेश्वरी वानखेडे, कु.राधा राखडे, कु.गायत्री राणे तसेच चतुर्थ सत्रातील कु.देवर्षी राठोड व कु.मिताली नोमुलवार यांचा समावेश होता. चमू व्यवस्थापक डॉ.एम.एन.पातोंड व डॉ.पी.यू.कवठेकर यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी हे सुयश संपादन केले. यशस्वी विद्यार्थिनींचे महारोगी सेवा समितीचे विश्वस्त डॉ.विकास आमटे, कौस्तुभ आमटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर.एच.रहाटे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.ज्योती श्रीराव तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ चे आयोजन.
दि. ०९ ऑगस्ट २०२२ , आनिकृम, आनंदवन.
महारोगी सेवा समितीद्वारा संचलित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत दिनांक ९ ते १७ ऑगस्ट या दरम्यान विविध कार्यक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये प्रामुख्याने चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, हर घर झेंडा जागरुकता रॅली व ध्वजारोहण कार्यक्रम इत्यादी यांचा समावेश होता.
या उपक्रमा अंतर्गत कृषी-विस्तार विभागामार्फत चित्रकला स्पर्धेचे आयोजन दि.०९ ऑगस्ट २०२२ रोजी विभाग प्रमुख डॉ. एस एन पंचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली “७५ वर्षांचा भारत” या विषयावर करण्यात आले. सदर स्पर्धेत एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस पोतदार, कृषी विस्तार विभाग प्रमुख डॉ. एस एन पंचभाई, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वक डॉ. एम. जे जोगी, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. आर एच रहाटे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. ज्योती श्रीराव तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.
कृषी महाविद्यालयात ‘कृषी क्षेत्रातील रोजगार संधी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
दि. 30 जुलै २०२२ , आनिकृम, आनंदवन.
महारोगी सेवा समितीद्वारा संचलित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथील स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीने ‘कृषी क्षेत्रातील रोजगार संधी व पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षा ‘ या विषयांवर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक ३० जुलै रोजी करण्यात आले.
कृषी महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न
दि. ११ जून २०२२ , आनिकृम, आनंदवन.
महारोगी सेवा समितीद्वारा संचलित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथील स्पर्धा परीक्षा मंच च्या वतीने ‘कृषी व पशु क्षेत्रातील शाश्वत विकासाकरिता विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण‘ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक ९ व १० जून रोजी करण्यात आले होते.
कोरोनापश्चात सर्व महाविद्यालये नियमित पणे सुरू झालेली असून विदयार्थ्यांमधील संवाद नियमित होण्याकरिता तसेच कोरोना काळातील ऑनलाईन सेवांचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या करियर निवडीकरिता व्हावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी कृषी अभियांत्रिकी शाखेचे विभाग प्रमुख श्री राजेश रहाटे, कृषीविद्या शाखेचे विभाग प्रमुख डॉ. सतीश इमडे उपस्थित होते.या कार्यशाळेला तज्ञ मार्गदर्शक म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कृषी विस्तार शिक्षण विभागाचे संशोधक डॉ अमोल भालेराव उपस्थित होते. कार्यशाळेतील विविध सत्रांमध्ये व्यक्तिमत्व विकास, कृषी क्षेत्रा ची सध्याची परिस्थिती, रोजगाराच्या संधी,परदेशातील कृषीशिक्षण व रोजगार तथा याकरिता लागणारी सर्व कौशल्ये यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोपिय कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थींची मनोगते जाणून घेण्यात आली तसेच सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन स्पर्धा परीक्षा मंचचे अध्यक्ष श्री नीरज आभारे यांनी केले .
आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात कृषी अवजारांची दुरूस्ती व देखभाल या विषयावरील प्रशिक्षणाचे आयोजन
दि. २९ डिसेंबर २०२१, आनिकृम, आनंदवन.
कृषी यांत्रिकीकरणाचे आव्हान स्वीकारत ग्रामीण युवकांना कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण देण्याकरिता आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था हैद्राबाद , वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नागपूर ( वनामती) तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण मोहिमेअंतर्गत कृषी अवजारांची दुरूस्ती व देखभाल या विषयावरील प्रशिक्षणाचे आयोजन दि. 23 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2021 दरम्यान आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथे करण्यात आले.
ANCA celebrates the Birth Anniversary of Dr. Panjabrao Deshmukh
Date 27th Dec 2021, ANCA, Anandwan
27th December is marked as the birth anniversary of Dr.Panjabrao alias Bhausaheb Deshmukh, the First Agriculture Cabinet Minister of India and the inspiring force behind the green revolution in Maharashtra in 1931-32, Dr. Bhausaheb devoted himself to educating the people by establishing numerous Schools, Colleges, Hostels, and other teaching and technical institutions. ANCA celebrated the birth anniversary of this great visionary of rural education in Maharashtra. Teachers and students shared his biography and his works through speeches to pay tribute to Krishiratna Dr. Panjabrao Deshmukh.
ANCA celebrates the Birth Anniversary of Shraddhey Baba Amte
Date 26th Dec 2021, ANCA, Anandwan
Anand Niketan College of Agriculture, Anandwan celebrates the Birth Anniversary of Shraddhey Baba Amte on 26th Dec. Baba gave learnable things to society, on this occasion teachers shared memories of Shraddhey Baba with the students. Principal Dr. Suhas Potdar extended thoughts of Baba Amte that are the all-time inspirational for the youth.
Tribute to Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar
Date 6th Dec 2021 , ANCA, Anandwan
Maha-parinirvan Din is observed annually on December 6th to mark the death anniversary of Dr. Bhimrao Ambedkar, the chief architect of the Constitution of India. Teachers of Anand Niketan College of Agriculture paid tribute in remembrance of Dr. Bababsaheb Ambedkar.
Anand Niketan College of Agriculture celebrates Agriculture Education Day
Date 03 Dec 2021, ANCA, Anandwan
On the occasion of the birthday (3 December) of the first Indian Union Agriculture Minister (1946) and the first President of Independent India, Bharat Ratna, Dr. Rajendra Prasad, an Agricultural Education Day is celebrated in India. Anand Niketan College also celebrated Agriculture Education Day with the coordination of the NSS Unit. Teachers explained why agricultural education is the need of the hour for extensive use of technologies along with resource management for more and more productivity from agriculture. on the occasion, Dr. S.S Potdar, Principal, Dr. M.G.Jogi (Programme Co-ordinator, NSS), and Mr. R.V. Tayde (HoD, Agril. Education and Extention) were attended the event and guided the students.
महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे आयोजन
दि. २८ नोव्हेंबर २०२१, आनिकृम, आनंदवन
समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी झटणारे, तत्कालीन समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवणारे तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या सोबतीने महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुले यांची पुण्यतिथी आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. प्रसंगी विद्यालयाचे रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज जोगी यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचे विवेचन केले.
आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात संविधान दिन साजरा
दि. २६ नोव्हेंबर २०२१, आनिकृम, आनंदवन
महाविद्यालयामध्ये सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रशासकीय सभागृहामध्ये सामुहिकपणे प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी संविधानाची निर्मिती, त्याचा इतिहास आणि संविधानाचे लोकशाहीमध्ये महत्व यावर विवेचन केले. प्रसंगी प्राचार्य डॉ. अमरशेट्टीवार यांनी सर्वांनी एकता, एकात्मता आणि बंधुता यांचा अंगीकार करून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करावा असे प्रतिपादन केले.
आमचे अभिमानबिंदू
दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ , आनिकृम, आनंदवन
दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३५ व्या पदवीदान समारंभात आपल्या महाविद्यालयाच्या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आभासी माध्यमातून (Online) घेण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आला.
१. श्री राहुल कड
विद्यापीठ स्तरीय सुवर्णपदके ( सात)
२. श्री अक्षय उईके
मातोश्री पार्वताबाई गाडे स्मृती पारितोषिक
माजी विद्यार्थी समितीतर्फे डॉ. आमटे सन्मानित
दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ , आनिकृम, आनंदवन
महारोगी सेवा समितीद्वारे संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी समितीतर्फे जेष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा सत्कार करण्यात आला.
आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस उत्साहात साजरा
आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी अहिंसेचा आणि सत्याचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच “जय जवान जय किसान” असा नारा देऊन देशाला आत्मनिर्भरतेचा वारसा देणारे लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर विध्यार्थ्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधण्यात आला. तसेच महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषा देखील आयोजित करण्यात आली होती.
अन्न हेच आजचे अध्यात्म व्हावे: डॉ. विकास आमटे
Inaugural Function of Alumni Association of ANCA
Independence Day @ ANCA
Date: 15th Aug, 2021 , ANCA, Anandwan India observes its 75th independence day today. To celebrate this day, Anand Niketan College of Agriculture, Warora conducted a flag hoisting ceremony, This year students were unable to take part in the celebration because of the Covid-19 condition. As a part of the central government’s initiative “Aazadi Ka Amrit Mahotsav” the Principal of the college, Dr. S. B. Amarshettiwar announced a tree plantation program of 75 saplings on the campus.आ.नि.कृषी महाविद्यालय , वरोरा (राष्ट्रीय सेवा योजना )
दि. ९ जुलै २०२१ , आनंदवन
शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम
महाराष्ट्र शासन निर्देशित शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम तथा मा.कुलगुरू यांच्या संकल्पनेनुसार ‘एक विद्यार्थी – एक झाड’ व स्व.साधनाताई आमटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त (९ जुलै) ही पर्यावरण मोहीम दि १ जुलै ते ९ जुलै (वृक्षसप्ताह ),दरम्यान मा.प्राचार्य,डॉ एस बी अमरशेट्टीवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
Vaccination Drive ANCA news in different local newspapers:
Date: 19th & 20th June, 2021 , Anandwan
Different local and regional newspaper published news of Vaccination Drive through honorary alumni of ANCA Dr. K. Ella.
Click here to download
Worthy gesture by a disciple to his noble Alma-mater